दसपटी आदिप्रवर्तक "श्रीमंत सोमजीराव रामाजीराव शिंदे" थोडक्यात परिचय - ऐतिहासिक लेख.
![]() |
Book Now.. Easy Travel.. |
रविवारी दिनांक ३१/०८/२०२५ रोजी दसपटकर शिंदे-कदम घराण्याच्या संयुक्त बैठकीचे आयोजन कुलस्वामिनी श्री. रामवरदायिनी देवीच्या प्रांगणात पार पडले. हि महत्वपूर्ण बैठक श्री. प्रतापराव शिंदे यांचे अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीला माजी अध्यक्ष श्री. शषिकांतराव शिंदे पेढांबे, अँड श्री. अनंतराव शिंदे (कादवड) आणि शिंदे कदम घराण्यातील मराठा समाज बांधव उपस्थित होते. बैठकीत प्रमुख विषय म्हणून “कुलस्वामिनी श्री. रामवरदायिनी देवस्थान ट्रस्ट” ची धर्मादाय नोंदणी आणि ट्रस्टमधील नावांकन (संदर्भ — शिंदे कदम कुळाचा उल्लेख कसा असावा — जहागीरदार, इनामदार किंवा खोत/मोकाशी ??) या बैठकीत श्री. संतोषराव शिंदे यांनी मांडलेल्या ऐतिहासिक व तर्कशुद्ध मुद्यांवर आधारित हा लेख "डिजीयुगंधरा" द्वारा प्रकाशित करीत आहोत.
१) ऐतिहासिक पार्श्वभूमी — दसपटीतील शिंदे-कदम घराण्याचा ईतिहास.
ई.स. १५५१ मध्ये कुंभार्ली, दाभोळ व अंजनवेवल या त्यावेळच्या ऐतिहासिक सुभ्यात शिंदे-कदम घराण्याने उपद्रवी शक्तींवर विजय मिळवून (बारभाई कोळी व आदिलशाह यांचा पराभव करून ) आपली सत्ता प्रस्थापित केली. त्या काळच्या राजकीय परिस्थितीत स्थानिक शक्ती, कट्टबंदी व राजकीय उलथापालथसहित विविध सुभे व बंदरे यांचे भूप्रदेशिक महत्त्व होते. उपरोक्त ऐतिहासिक तीन सुभ्यांवर दसपटकर शिंद्यानी स्वतःचे प्रशासन स्थापून, त्या सुभ्यांवर दहा टक्के कर लावत स्वतःची प्रशासकीय व्यवस्था रुजू केली आणि त्यातील सुमारे २८ गाव आपले जहागिरीत घेतली. मजरे दादर येथे देवी रामवरदायिनीच्या पूजे व व्यवस्थेसाठी जवळजवळ ४५० एकर जमिन, गुरव पुजारी नेमून देवीच्या पूजा अर्चाचं खर्चासाठी राखीव ठेवण्यात आली. त्याकाळात बहुतांश राज्यात साधारणतः २५ ते ३० टक्के कर प्रशासक प्रजेकडून वसुलत असत परंतु शिंदे राज्यांनी जिंकलेल्या सुभ्यांवर स्वतःची अंतरीम प्रशासकीय व्यवस्था नेमून, सरसकट दहा टक्के कर लावला. त्यावेळेच्या याच दहा टक्के कर घोषणेमुळे शिदे हे दसपटकर शिंदे-कदम संबोधीले गेले. सुमारे ५०० वर्ष्या नंतर देखील या घराण्याची आज दसपटकर हिच ओळख आहे. हि आमच्या महान पूर्वजांचा पुरुषार्थ आणि पुण्याई आहे, म्हणून आमची हीच ओळख आज देखील “दसपटकर” म्हणून महाराष्ट्रात सर्वश्रूत आहे.
![]() |
Click Here For HSBC Platinum Credit Card |
२) जहागीरदार, इनामदार व खोत/मोकाशी — संकल्पनात्मक फरक आणि का “जहागीरदार” योग्य आहे?
-
जहागीरदार (Jagirdar) : पारंपरिक राजवटीत लढाई, प्रशासकीय व संरक्षण सेवा देणाऱ्या कुटुंबांना ते भूभाग व प्रशासनिक अधिकार होत. जो त्यानी स्वतःच्या बाहुबलाने जिंकलेला असे. त्यातील काही भूभाग हा त्यांचे व कुटुंबियांचे खाजगी उपजिवीकेचा स्त्रोत असे. जहागीर हे सामान्यतः सामरिक-सामाजिक गणमान्यतेचा पुरस्कार असायचा आणि त्या भूभागाची संरक्षण-व्यवस्थाही जहागीरदार करीत असे. हे एक सार्वभौम वंशपरंपरागत हक्काचे स्वरूप दाखवते. जहागीरदारी हि त्या काळी केवळं राजघराण्यांकडे असे.
-
इनामदार (Inamdar) : हे राज्याचे वाढीसाठी दीलेल्या योगदानाचे बक्षीस किंवा पुरस्कार म्हणून दिलेले वतन असे. इनाम हे अगोदर हिंदू राजवटीत सनधीन व नंतर ब्रिटिश/राजवटीत-व्यवस्थेत आलेले शासकीय अनुदान व करमुक्त जागांचे वर्गीकरण आहे. इनामाचे स्वरूप, हक्क व कायदेशीर परिणाम भिन्न काळात बदललेले दिसतात.
-
खोत / मोकाशी (Khot / Mokashi) : हे महसूली स्वरूपातील वर्गीकरण आहे, ज्यात जमिनीवरील पंजीकरण, कर व कृषी-हक्कांचा तपशील असतो. हे खरेतर महसूल प्रशासनाशी निगडीत संज्ञा आहेत — आणि इतर दोघांप्रमाणे ऐतिहासिक वंशपरंपरागत अधिकार दर्शवित नाहीत. हे ब्रिटिश काळात महसूल किंवा शेतसारा गोळा करण्यासाठी दिलेलं पद आहे. हा ब्रिटीश सरकार आणि जनता यांचे मधील महसूली कार्यासाठी नेमलेला मध्यस्थी होत.
परंपरेनुसार — इ.स. १५५१, दसपटीच्या स्थापना-कालखंडात आणि शिंदे कदमांच्या भूमिका पाहता, हा भूभाग “जहागीरदार” (वाचा, दसपटीचे प्रथम जहागीरदार ) म्हणून प्रस्थापित झाला. कारण आमच्या पुर्वजानी बारभाई विरोधात निर्णायक यु्दध लढून जो भूभाग जिंकला, तो त्यावेळेच्या इस्लामिक सत्ताधीश, सुलतांणाना देखील जिंकता आला नाही. बहामनी, आदिलशहा या दक्षीणेतल्या प्रस्थापित सत्तांना बारभाईनी अनेकदा पराजीत केले होते. केवळ पराजीत नह्वे तर त्यांच्या फौजा समूळ बुडविल्या होत्या, फौजेतील एकही सैनीक बारभाईनी परत जाऊ दिला नाही. एवढा दारूण पराभव बारभाईनी त्या सुलतानी आक्रांतांचा केला होता. त्याला इतिहास साक्षी आहे. असा भूभागात शिंदे-कदम घराण्यानी भाग्यविधायक विजय मिळवून त्या भूभागाची स्थिर व्यवस्था निश्चित केली आणि आपली कुंभार्ली, दाभोळ, अंजनवेल या सुभ्यात सार्वभौम सत्ता प्रस्थापित केली. — जे इनामदार किंवा महसूली खोतांच्या नंतरच्या हुद्याशी ना सुसंगत आहे अथवा मेळ खात नाही. म्हणून, या विषयाचा अभ्यासक, संशोधक विचारवंत, मी श्री. संतोषराव पां. शिंदे, आपल्या महान पुर्वाजांची अस्मिता, पराक्रम आणि पुरषार्थ यांचा सन्मान करून, विनंती पुर्वक परामर्श करतो की, ट्रस्टच्या दस्तऐवजात “शिंदे-कदम जहागीरदार” असा महत्वाचा उल्लेख ह्वावा. असे केल्याने आपली दसपटकर शिंदे - कदम हि ऐतिहासिक सत्यता, ज्याची साक्ष खुद्द "कुलस्वामिनी श्री. रामवरदायिनी" आहे, ती कायम राहील, जो पर्यंत सुर्य, चंद्र, तारे अस्तित्वात आहे आणि आपली चालू पिडी अश्याप्रकारे वर्तमान लोकशाहीत आपल्या पुर्वजांचे स्म्रुतीस जिवंत ठेऊन नवा इतिहास रचेल. त्याचबरोबर भविष्यातील वादांपासून ट्रस्टची ओळख व अस्तित्व सुरक्षित होईल. याची मला खात्री आहे. मी आपल्या माहीती व संदर्भासाठी त्याकाळातील खालील ऐतिहासिक घडामोडींवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करतो.
३) विजयनगर साम्राज्याचा उदय आणि महाराष्ट्रात शिंदे घराण्याची दौड.. संक्षिप्त संदर्भ आणि स्थानिक परिदृश्याशी जोडणी.
![]() |
Buy Now |
विजयनगर साम्राज्याचे वैभव आणि शिंदे घराण्याची परंपराः
भारतीय इतिहासात विजयनगर साम्राज्य (१३३६ – १६४६) हे एक अद्वितीय व वैभवशाली साम्राज्य मानले जाते. हरिहर आणि बुक्क राय या संगम वंशातील दोन भावंडांनी हे साम्राज्य स्थापन केले. कृष्णदेवराय (१५०९ – १५२९) हा विजयनगरातील सर्वात प्रख्यात सम्राट मानला जातो. त्याच्या काळात साम्राज्याने सांस्कृतिक, राजकीय आणि आर्थिक प्रगतीचा शिखर गाठले.
विजयनगर साम्राज्याने दख्खनमधील बहुतेक भागावर नियंत्रण प्रस्थापित केले होते. त्यांच्या कारकिर्दीत किल्ले, मंदिरे, शिल्पकला, व्यापार आणि साहित्य यांना मोठ उत्तेजन मिळाले. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र आणि तामिळनाडू या सर्व प्रदेशांवर विजयनगरचा प्रभाव होता. महाराष्ट्रातील अनेक घराणी या साम्राज्याशी संलग्न होती आणि ही घराणी वेगवेगळे सुभे जिंकून अथवा बनवून आपली सत्ता प्रस्थापित करत. त्यातीलच एक शिंदे घराणे. जे १४ व्या शतकात विजयनगर साम्राज्याच्या उदयाचे वेळीस महाराष्टात प्रस्थापित झाले.
विजयनगर साम्राज्य (सामान्यत: १३३६ मध्ये स्थापन) हे साम्राज्य दाक्षिणात्य उपखंडातील एक महान राजकीय व सांस्कृतिक केंद्र होत. त्याचा प्रभाव मराठवाडा, कोकण व दख्खनातील राजकीय घडामोडींवर पडत होता. दख्खनमधील विविध स्थानिक घराणी, जसे की शिंदे-कदम, सुर्वे, सावंत, मोरे इ. (९६ कुळी) राजघराणी, स्थानिक सत्ता-संघर्षात विजयनगर व इतर सत्तांशी परस्पर संबंध ठेवत असत. माझ्या संशोधनानुसार, दसपटीच्या स्थापनेचा काळ हे दख्खन व दक्षिणेतील राजकीय बदल यांच्या परस्पर सामाजिक, राजकिय व आर्थिक संबंधांचा एक भाग आहे — अपराजीत योद्धा व त्यांचे सामर्थ्य, यांनी बंदरे (उदा. दाभोळ) त्याकाळातले महत्वाचे आंतरराष्ट्रीय व्यापारमार्ग, यातून मिळणारे उत्पन्न यांनी सामर्थ्य उभे केले. सामाजिक-राजकीय आस्थेच्या हेतूपुरक मोहिमांनी एकत्र येऊन स्थायी सत्ता स्थापनेची पार्श्वभूमी तयार झाली, ज्याची झलक दसपटकरांच्या त्याकाळच्या परंपरा, राजकीय आणि सामाजिक व्यवस्थेतून आपल्या द्रुष्टीत पडते. त्यामुळे विजयनगर व त्याकाळच्या राजकीय घडामोडींचे संदर्भ देऊन, आमच्या जहागीरदारत्वाचे सामरिक व ऐतिहासिक तर्क इथे सुसंगत ठरतात.
४) कुलस्वामिनी देवी व देवस्थानाचे सांस्कृतिक-मूल्य
कुलस्वामिनी श्री. रामवरदायिनी हे केवळ धार्मिक दैवत नाहीत; त्या आमच्या घराण्याच्या विजयाचे, एकात्मतेचे व सांस्कृतिक प्रतीक आहेत. मजरे दादरमधील देवस्थान ही सामुहिक श्रद्धास्थळ असून त्याचे संचालन धार्मिक अनुष्ठान, उत्सव व सामाजिक एकत्रतेसाठी केले गेले होते आणि ते अबाधित असावे. ट्रस्ट स्थापनेचा मुख्य उद्देश हा देवस्थानाचा सांस्कृतिक वारसा जतन करणे, पूजा-व्यवस्था सुरळीत चालवणे व जमिनीचा उपयोग केवळ देवीच्या सेवेसाठी राखणे हा असावा याचा उल्लेख देखील ट्रस्टचे घटने मध्ये नमुद असावा.
![]() |
Click here for Swiggy HDFC Bank Credit Card |
५) ट्रस्ट स्थापनासाठी तात्विक व कायदेशीर शिफारसी:
-
ट्रस्टच्या नामकरणात ऐतिहासिक सत्यता: ट्रस्ट अंधश्रद्धेचे किंवा केवळ चमकदार आधुनिक संज्ञेने नव्हे तर ऐतिहासिक दाव्याचे प्रतिबिंब असलेले नाव लावणे गरजेचे आहे — उदा. “कुलस्वामिनी श्री. रामवरदायिनी देवस्थान ट्रस्ट (दसपटकर — शिंदे-कदम जहागीरदार परंपरा)”. यामुळे पारंपरिक हक्क व जबाबदारी स्पष्ट दर्शवता येतील.
-
ट्रस्ट घठने मध्ये जहागीरदार म्हणून उल्लेख: ट्रस्टचे उद्दिष्ट, मालमत्तांचे व्यवस्थापन, पूजा-नीती, उत्पन्न वापर आणि प्रशासन या सर्वात स्पष्ट कलमांत ‘शिंदे जहागीरदार’ या संज्ञेचा वापर केल्यास इतिहास व पारंपरिक हक्कांचे संरक्षण होईल. भविष्यात ते अबाधित राहील.
-
वारसा व सेवाभाराचे नियम: गुरव/पुजारी किंवा सेवेकऱ्यांना दिला जाणारा हक्क सेवा-आधारित व न केवळ वारसावर अवलंबून ठेवण्याचे कलम ठेवावे; शर्तींचा उल्लंघन झाल्यास ताबडतोब ट्रस्टकडे परत मिळवण्याची व्यवस्था असावी.
-
सामाजिक भागीदारी व तज्ञ सहभाग: ट्रस्टमध्ये केवळ शिंदे-कदम कुटुंबातील वारस आणि त्यांचेतील तज्ञ यांचा समावेश असावा — ज्यामुळे धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक, परंपरा यासंबंधीत संपूर्ण निर्णय सामूहिक व पारदर्शक होतील.
६) निष्कर्ष — का “शिंदे - कदम जहागीरदार” (वाचा, दसपटीचे प्रथम जहागीरदार) उल्लेख आवश्यक व न्याय्यस्थीत आहे.
दसपटकरांच्या परंपरेचा, सामरिक विजयाचा व देवीच्या प्रति निष्ठेचा इतिहास पाहता, ट्रस्ट मध्ये “शिंदे - कदम जहागीरदार” हा उल्लेख ऐतिहासिक सत्यतेचे, सामाजिक, सांस्कृतिक, देवीच्या प्रती आस्थेचे व आपल्या महान पुर्वजांची अस्मिता जपण्याचे प्रतीक असेल. हे सत्य देवस्थान ट्रस्ट चे माध्यमातून वर्तमानात प्रत्यक्षात उतरविणारे देखील नवा इतिहास रचतील. इनामदार किंवा खोत/मोकाशी असे नावे वापरल्यानं इतिहासातील सत्यतेचा आणि त्याच्या मूळ तत्त्वांचा एक प्रकारे अपमान आहे. ट्रस्ट हे भविष्यात देवस्थानाच्या योग्य व्यवस्थापनासाठी, पूजा-चालनासाठी व जमिनीच्या संरक्षणासाठी बनवले जात आहे — तर त्याच्या संस्थात्मक रंगभूमीत पारंपरिक जहागीरदारत्वाचा उल्लेख राखणे हे सर्वाधिक सुसंगत व न्यायप्रविष्ट असून पुढील पिढीला प्रेरणादायी असेल.
![]() |
Book My Show |
विश्लेषक: श्री. संतोषराव शिंदे, दसपटी. मुख्य संपादक: डिजीयुगंधरा.
If you have any query, please let me know.