अखिल भारतीय मराठा महासंघ आणि दसपटी विद्यमानाने अयोजित मराठा शक्ती आणि संस्कुती जाग्रुती मेळावा २०२४ चे चिपळुण मध्ये यशस्वी अयोजन. ना. श्री. नरेंद्रजी पाटिल प्रमुख पाहुणे तर महसंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. राजेंद्रजी कोंढरे अध्यक्ष स्थानी.

डिजीयुगंधरा (DgYugandhara)
0

मराठा शक्ती आणि संस्कृती जाग्रुती मेळावा २०२४ ला संबोधीत करताना कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, श्री. नरेंद्रजी पाटील, अध्यक्ष श्री. राजेंद्रजी कोंढरे आणि मुख्य सयोजक श्री. संतोषराव शिंदे.

डिजीयुगंधरा चिपळुण प्रतिनिधीः रविवार,  दिनाकं १ सप्टेंबर २०२४ रोजी, इंदिरा गाधी सांस्कृतिक केंद्र चिपळुण येथे अखिल भारतीय मराठा महासंघ व दसपटी वतीने घेण्यात आलेला मराठा शक्ती आणि स़ंस्क्रुती जाग्रुती मेळावा २०२४,   दिमाखात पार पडला.  या मेळाव्याला अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास महाविकास मंडळाचे अध्यक्ष मा. श्री. नरेंद्रजी पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. श्री. राजेद्रजी कोढरे  यांनी भुषविले. त्याचप्रमाणे दसपटी विभागातून रामवरदायिनी देवस्थान ट्रस्ट चे अध्यक्ष व उद्योजक श्री. प्रतापराव शिंदे, उद्योजक श्री. अविनाशराव शिंदे, श्री. दिपकराव शिंदे, श्री. शामकांत कदम इ. मान्यवर उपस्थित ह़ोते. तर खेड तालुक्यातून मा. आमदार श्री. संजयजी कदम, महासंघाचे सरचिटणीस श्री. प्रकाशजी देशमुख, कोकण विभाग प्रमुख श्री. प्रविणजी पवार अश्या मान्यवरानी आपली उपस्थिती दर्शवीली. त्याचप्रमाणे फार्मर प्रोड्युसर आँर्गेनायजेशन व सहकारचे चे जानकार श्री. राजकपूर सिंग यांनी उपस्थिताना संबोधित करताना सहकार हे विकासाचं स्त्रोत असून ते राबविल्याणे कोकणचा विकास शक्य असल्याचे सांगून, त्याच्या नियोजनाची देखील हमी त्यानी घेतली. संजय यादवराव व राजन घाग यांनी देखील मेळाव्याला संबोधित करताना कोकणची भुमी ही देणारी असून समाजानी एकत्र येण ही काळाची गरज असून, समाजाने समाजकंटकांचे बोलण्याला बळी न पडता   एकत्र यावं, असं आव्हान देखील केलं.   

अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे ना. श्री. नरेंद्रजी पाटील यांना सन्मानित करताना श्री. संतोषराव शिंदे व व्यासपिठावरील उपस्थित मान्यवर.

अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष श्री. नरेंद्रजी पाटील, यांनी कोकणातील उद्योगांना उभं करण्यासाठी महामंडळाच्या माध्यमातून सर्व ती मदत केली जाऊन, चिपळुणात देखील अण्णासाहेब पाटील महमंडळाचे एक कार्यालय उघढण्यासाठी महासंघाचे जिल्हा कार्यकरीणीला  सुचना केली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी असलेले श्री. राजेंद्रजी कोढरे यांनी देखील उपस्थिताना अभ्यासपूर्ण मार्गदर्शन करीत, कोकणातील लोकानी उद्योगाचे उदासिनतेचा त्याग करून, उद्योगात समर्थपणे उतरण्याचे आव्हान केले. महासंघाचे जिल्हा अध्यक्ष श्री. लक्ष्मण बामणे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक मांडले तर महासंघाचे रत्नागिरी उपाध्यक्ष व डिजीयुगंधराचे मुख्यसंपादक श्री. संतोषराव शिंदे यांनी आलेल्या मान्यवरांचे दसपटी वतीने  स्वागत करत, उपस्थित मान्यवराना दसपटीचे ध्वजमुद्रेने सन्मानित करीत त्यांचे आभार मानले आणि दसपटी म्हणजे केवळ तेरा गांव शिंदे - कदम असे नसून, प्रस्थापित राजकारण्यानी केलेलं हे षडयंत्र असल्याचे सुचवित, कुंभार्ली ते दाभोळ हा संपुर्ण ऐतिहासिक सुभा   दसपटी असल्याचे सांगितले. त्याचे उद्धार आणि विकासासाठी आम्ही दसपटकर कटीबद्ध असून, त्याचे विकासाठी शासनाने सहकार्य करण्याची विनंती  कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा. श्री. नरेंद्रजी पाटील  व अध्यक्षस्थानी असलेल्या राजेंद्रजी कोंढरे यांना व कार्यक्रमात उपस्थित इतर मान्यवरांना केली आणि मान्यवरांनी सहकार्याची हमी देत, कोकणात उद्योजक उभे करण्साठी सर्व प्रकारचे सहकार्य देण्याचे ना. श्री. नरेंद्रजी पाटील यांनी अश्वासीत केले.

अखिल भारतीय मराठा महासंघाचे अभ्यासू अध्यक्ष मा. राजेंद्रजी कोंढरे यांना सन्मानित करताना श्री रामवरदायिनी देवस्थान ट्रस्ट चे अध्यक्ष श्री. प्रतापराव शिंदे, जिल्हा अध्यक्ष लक्ष्मणजी बामणे व इतर मान्यवर.

या मेळाव्यासाठी बँकांचे प्रतिनीधीनी देखील उपस्थित राहून विशेष मार्गदर्शन केले व कोकणातील उद्योजकांना आर्थिक सहाय्य मिळण्यासाठी सर्व सहाय्य बँका कडून केले जाण्याचे सांगितले.


या मेळाव्यासाठी मराठा महासंघाचे श्री संजयजी कदम संगमेश्वर तालुका अध्यक्ष, श्री. विनोदजी ग़ोगावले खेड तालुका अध्यक्ष, श्री. मंगेशजी शिंदे,  श्री संतोषजी सावंत, शामराव मोहीते, प्रकाषजी सालवी तर दसपटी विभागतून श्री. सुरेशराव शिंदे, श्री. पांडुरंगराव शिंदे, सुशिलराव शिंदे, अभिजीत शिंदे, प्रकाशराव कदम, चंद्रकांत शिंदे, गणेशराव शिंदे आणि गिरीशजी चापडे यांनी मराठा मेळावा यशस्वी होणेसाठी अथक परीश्रम घेतले. यासर्व मंडळींचे महासंघाचे व दसपटी वतीने आभार.



त्याचप्रमाणे या मेळाव्याचे उद्देश गावोगावी पोचविण्यासाठी, चिपळूण, संगमेश्वर तालुक्यात अँग्रो टुरिझम, अँग्रीकरचरल, व छोटे मोठे उद्योजक तयार करण्यासाठी दसपटी वतीने विशेष समिती बनवून विभागात गोवोगावी जाऊन उद्योगासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगत, लवकरच दसपटीत अवैध जमिन विक्रीवर रोख आणून, ओसाड जमिनी लागवडी खाली आणण्यासाठी अँग्रो टुरिझम, आँरगेनिक अग्रीकलचर इ. उपक्रम राबवून नवीन उद्योग व भुमिपुत्राना नोक-या उपलब्ध करून देणार असल्याचे आपल्या संवादा दरम्यान, डिजीयुगंधरा ला देण्यात आलेल्या मुलाखतीत कार्यक्रमाचे मुख्य संयोजक श्री. संतोषराव शिंदे यांनी स्पष्ट केले. त्यासाठी गावोगावी दौरे काढून, यासंबंधी तरुणांमध्ये जाग्रुकता करणार असल्याचे देखील ते
कार्यक्रमानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. डिजीयुगंधरा DgYugandhara द्वारा प्रसारीत.

 
प्र. पाहुणे श्री. नरेंद्रजी पाटील यांची स्नेह भेट घेताना कार्यक्रमाची नियोजन समिती पदाधिकारी सोबत सहकार जानकार श्री. राजकपुर सिंग व मुख्य संयोजक संतोषराव शिंदे.


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

If you have any query, please let me know.

टिप्पणी पोस्ट करा (0)
https://www.effectivegatecpm.com/i753t25bv?key=4e88fd94f666800bc06717f96dec2dac