श्री. रामवरदायिनी देवस्थान.. बारभाई कारस्थान ? भाग -१ । आम्ही दसपटकर वतीने प्रकरण उघडकीस - प्रकरणाची करणार चौकशी..

डिजीयुगंधरा (DgYugandhara)
0


 
'आम्ही दसपटकर' समुह
समस्त समाजबांधव नमस्कार..! जय महाराष्ट्र..!

विषय फार महत्वाचा.. श्री रामवरदायिनी देवस्थान, बारभाई कारस्थान - रामवरदायिनी ट्रस्ट विवाद, शिंदे - कदम घराण्याची अस्मिता व भावी पिढीच्या अस्तित्वाशी निगडीत हे प्रकरण..! म्हणूनच हा खटाटोप. डिजीयुगंधरा च्या माध्यमातून आपणा समोर बारभाई कारस्थान भाग - १   या नावाने प्रकाशित करीत आहोत. इ. सन १५५१ मध्ये एक बारभाई प्रकरण सह्याद्रीच्या कुशीत आपल्या महान पुर्वजांनी शमवल ते पुंडाई करणा-या बारभाईंंचा वध करून आणि बाहेरून आलेल्या आयाराम विजापूर आदिलशहाला, बहामनी साम्राज्याना शह देऊन.


आज देखील  काहीस वेगळ, बारभाई कारस्थान देवस्थानच्या विषयात चालू असल्याची कुजबुज सूर आहे ते  १४ गांव दसपटी करण्याचे. प्रकरण रेटत आहेत १२ गांव विश्वस्त.  ऊघड विरोध नांदिवसे - ओवळी करीत असल्याने, हि दोन गांव तुर्तास वजा म्हणजे उरलेले बारागावचे बाराभाई अज्ञानवश  करीत आहेत किंवा जाणून बुजून? म्हणून बारभाई कारस्थान हे नाव  या बारभाईंचे  प्रकरणास अनुरुप आहे. कारण यापुढे या प्रकरणाचे संदर्भात जे काही घडेल, तो इतिहास बनेल आणि हे प्रकरण या पुढे इतिहासात दसपटकर बारभाई  कारस्थान   प्रकरण म्हणूनच ओळखलं जाईल. हे होत बारभाई प्रकरणावर समाजबांधवांचे माहीतीसाठी स्पष्टीकरण. त्याचा  भाग - १ 'डिजीयुगंधरा' द्वारा प्रकाशित होत आहे. तुमच्या माहीतीसाठी जसे हे प्रकरण पुढे जाईल, तसतसे वेगवेगळ्या भागामध्ये हे प्रकरण प्रकाशित होईल. वास्तविक हे प्रकरण, प्रत्येक  गावातील विश्वस्तानी ग्रामस्थांना, दसपटकर शहरी मंडळीना महीतीकरुन, विश्वासात घेऊन निर्णय घेणे गरजेचे आणि स्वाभाविक होते परंतु तसे होत नसल्याने ही धुरा 'आम्ही दसपटकर' समुह  स्विकारत आहोत. 'डिजीयुगंधरा' द्वारा प्रकाशित करीत आहोत.


 वर्तमान 'बारभाई कारस्थान' हे प्रकरण   मजरे दादर गाव,  आपली कुलस्वामिनी श्री रामवरदायिनी मंदिर देवस्थान ट्रस्ट यासंबंधीत आहे. आपल्या प्राथमिक माहीतीसाठी हा अस्तित्वाचा, पुर्वचाचे अस्मितेचा विषय आज कट  कारस्थानानी  व्याप्त, पुर्वाजांची आस्मिता व भावी पिढीचे अस्तित्वच धोक्यात येण्याचे संकेत आहेत  आणि  म्हणूनच आपणा सर्वा समक्ष  'आम्ही दसपटकर' समुह वतीने हे प्रकरण उघड करीत आहोत.   


श्रीरामवरदायिनी देवस्थान मंदिराचा कारभार सार्वजनिक विश्वस्त संस्था (Public Trust) म्हणून नोंदवायचा, की तो खाजगी (Private Trust) आहे? यावर पुर्वी पासूनच संभ्रम होता व त्यावर निर्णय देखील झाला होता. देवस्थान खाजगी म्हणजे शिंदे कदम घराण्याचे असल्याने, ते पब्लिक होणे शक्य नाही, असा निर्णय, सह धर्मदाय आयुक्तांनी दिला असताना देवस्थान पब्लिक करण्यासाठी संभावित विश्वस्त नेटाचे प्रयत्न करीत असल्राचे कळते. हा एवढा उतावळेपणा कशासाठी??


या प्रकरणात  अर्जदार दस्तुर खुद्द माननीय माजी आ. कै. राजारामराव आप्पा यांनी पब्लिक ट्रस्ट करण्यासाठी अर्ज केला होता.  सह धर्मदाय आयुक्त रत्नागिरी यांनी एप्रिल २००४ मध्ये, श्री. रामवरदायिनी देवस्थान ट्रस्ट पब्लिक करण्याचे अर्जावर निर्णय देताना, काही सत्य व संभाव्य घटनांचा आढावा घेऊन देवस्थान ट्रस्टचा अर्जच फेटाळल्याचे, आम्हा कडे हल्लीच उपलब्ध झालेल्या दस्तऐवज वरून निदर्शनास आले. मग असा कोणताही निर्णय पारीत झाला असताना, याची माहीती   विद्यमान विश्वस्ताना  न्हवती का? कि समाजाला दिशाभूल करून काही वेगळं साधण्याची चेष्टा समजावी ?? याचे उत्तर  प्रत्येक गावचे  विश्वस्ताना त्यांचे गावचे समाजबांधवाना द्यावे लागेल.


 श्रीरामवरदायिनी ट्रस्ट चे पब्लिक करण्याचे उपक्रमाला आमचे नांदिवसकर बंधू कै. अँड विनायकराव साहेबांनी व इतर नांदिवसकर समाज बधूनी तसेच, दसपटीतील इतर जानकार विद्वानांनी देखील विरोध केला होता आणि त्यांचा विरोधसंबधीत मुद्दा मा. आयुक्तांनी नोंद करून, पब्लिक ट्रस्ट संबंधित   कै राजारामराव आप्पा यांचा अर्ज फेटाळून पब्लिक ट्रस्ट करण्यास मान्यता नाकारली होती आणि हे देवस्थान शिंदे घराण्याचे खाजगी असल्याने ते पब्लिक करण्याचे संभवतेवर मा. स. धर्मदाय आयुक्तानी रोख आणली होती.


आज देखील बहुतांश ७०% समाज बांधव प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष  पब्लिक ट्रस्ट करण्यास  विरोध करीत आहेत. असे असताना समाजातील  विद्वानांना एक आमचा  प्रश्न आहे, आमचे बंधु कै. अँड विनायकराव शिंदे आज हयात नाहीत परंतु त्यांचे सोबत असणारी  त्यांची नांदीवसकर मंडळी  हयात आहेत आणि ही मंडळी   दिनांक ५ तारखेच्या बैठकित हजर होती. मग आमच्या मंडळींचे मत परिवर्तन कसे झाले? ते कोणी केले? आणि  देवस्संथान खाजगी असल्याचे कोणतेच पुरावे या संबंधात उपलब्ध नाही असे विधान ठोकून देत, नांदिवसे गाव दसपटीसोबत आहे  अशी बेलाग भाषा आणि  वर्तनुक करण्याची चेष्टा खूद्द रामवरदायिनी चे मंदिरात करण्याचं धाडस या महानुभवांना आलं कुठुन??  याबाबतीत नांदिवसे गावातुन पाठविलेले विश्वस्त देखील काही बेजबाबदार, तर्कशुन्य वक्तव्य करुन  कोणाच्या अजेंड्यावर काम करीत आहेत का ?? असे अनेक प्रश्न आता उभे राहण्यास वाव आहे. आणि याची उत्तर समाजबांधवाना, तुम्हाला द्यावी लागतील. गावातील दोन - तीन कारभारी म्हणजे संपुर्ण गाव किंवा समाज नाही, हे या मंडळींने लक्षात घेऊन कोणतेही बेजबाबदार क्रुत्य करण्याची चेष्टा करावी. 


त्यापलीकडे पुर्वजाची अस्मिता आणि भावी पिढीचं अस्तित्व टिकविण्यासाठी झटणारे  समाजात अनेकजण होते आणि आज देखील अनेक मंडळी आपले कामधंदे संभाळून समाज हितासाठी कार्य करीत आहेत, त्यांचे मनसेवर क्षुद्र भावणेने प्रश्न चिन्ह?? 


आपल्या पुर्वजाचा इतिहास रक्तरंजित आहे. त्यांचे रक्ताने पावन झालेली ही भुमी, श्री रामवरदायिनीचे क्रुपेने दसपटकरांना लाभली म्हणून ती आपली कुलस्वामिनी आणि ही भुमी देवभूमी, आपलं खाजगी देवस्थान असताना कोणी ते पब्लिक करण्याचे षडयंत्र म्हणजे देवस्थान आणि पुर्वजांची प्रताडना नव्हे का ?? किंवा त्यात कोणीही प्रत्यक्ष - अप्रत्यक्ष सामील  असतील किंवा मुंग गिळून गप्प बसणं योग्य समजत असतील, तर त्या मंडळींच्या संवेदना बोथड झाल्या असाव्यात किंवा त्या म्रुत झाल्या?? तसं असेल तर, अशी मंडळी समस्त समाजाला दिशाभूल करत, अस्तित्वहीन करण्याचे कगारवर समाजाला आणन्यासाठी आपली, बुद्धि आणि ताकद लावत असल्याचे स्पष्ट होत आहे.


या संदर्भात लवकरच आम्ही विस्तृत माहिती, मिळालेले दस्ताऐवजाचे आधारे सत्य समस्त समाज बांधवासमोर मांडू परंतु अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणा-य या मंडळींचे आणि बेगाण्या शाधीमध्ये, दिवाणे झालेल्या या अब्दुल्लांंचे मनसुबे आम्ही फळू देणार नाही.  असे 'आम्ही दसपटकर' वतीने स्पष्ट करतो.

'आम्ही दसपटकर' समुह द्वाराः                                    

शब्दांकन श्री.  संतोषराव शिंदे

📞खाली दिलेल्या बटनावर क्लिक करा आणि 'आम्ही दसपटकर' ला संपर्क करा किंवा WhatsApp करुन, यासंबंधात तुमचे  मत आम्हाला त्वरीत कळवा.

📞 Call Now 💬 Chat on WhatsApp 💬 WhatsApp Us


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

If you have any query, please let me know.

टिप्पणी पोस्ट करा (0)