![]() |
"अवैध वाळू-जंगल माफियांनो सावधान! आता जनता झोपणार नाही – लढा सुरू झाला आहे!" |
नांदिवसे (ता. चिपळूण) दिनांक १४ आँगस्ट २०२५. डिजीयुगंधरा प्रकाशित
गेल्या काही वर्षांपासून नांदिवसे, दसपटी परिसरात अवैध वाळू उत्खननाचा सुळसुळाट सुरू असून, याला आळा बसवण्यासाठी व दोशींवर कारवाई होण्यासाठी, नांदिवसे गावातील रहिवासी बाबू जनार्दन झोरे यांनी १५ ऑगस्ट २०२५ रोजी ग्रामपंचायत कार्यालयासमोर अनिश्चितकालीन उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे.
![]() |
Click करा आणि दररोज कमवा. |
या घटनेची सुरुवात नांदिवसे गावात चालणा-या अवैध वाळू उत्खनन प्रकरण व त्याला स्थानिक प्रशासन वारंवार दुर्लक्षित करत असल्या कारणाने होत असून, आता तर वाळू माफियांच्या अश्या अवैध घटणांना विरोध करणा-यांवर जिवे मारण्याच्या धमक्या तसेच प्रयत्नातून होत असल्याचे झोरे यांनी डीजीयुगंधराशी बोलताना व घटनेचा तपशील देताना कळवतले. त्यांमुळे यातून अनेक धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत. त्या म्हणजे,
- स्थानिक प्रशासनातील आधिकारी या अवैध वाळू उत्खनना मधून मिळणा-या मिळकतीत सहभागी आहेत का?
- मग जर नाही तर अद्याप या माफियांवर प्रशासन कारवाई का करत नाही?
असे अनेक मुद्दे उपस्थित होत असताना स्थानिक प्रशासन आणि पोलिस प्रशासन यांची जनमानसात चुकीची व नकारात्मक प्रतिमा तयार होत आहे आणि हि फार चिंताजनक बाब आहे.
"डिजीयुगंधराला" दिलेल्या घटनेची तपशीलवार माहीती देताना झोरे सांगतात, दिनांक १ जुन २०२५ रोजी दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास चिपळूण प्रशासनाने जप्त केलेली वाळू हसन जलाल मुल्ला व निजाम जलाल मुल्ला हे चोरून ट्रँक्टरने वहातूक करताना झोरे यांचे निदर्शनास आले असता, त्यानी मुल्ला बंधूना चोरी करताना रोकले. त्यामुळे त्यांचेवर ट्रँक्टर चढविण्याचा प्रयत्न मुल्ला बंधूनी केला. त्यात ११ हल्लेखोर होते, त्यामध्ये सहा जनांवर गुन्हे दाखल झाले असून, पाच जन अद्याप फरार असल्याचे कळते असे त्यांनी "डिजीयुगंधराला" कळविले आहे. गुन्हे दाखल झाले असले तरी अद्याप दोशींवर कोणतीही कायदेशीर कारवाई झाली नाही. परिणामी झोरे यांनी अवैध वाळू उत्खनन, नदीपात्राची तोडफोड आणि पर्यावरण हानी याविरुद्ध आवाज उठवण्यास सुरुवात केली तेव्हापासूनच त्यांना वाळू माफियाकडून धमक्या, मानसिक छळ आणि जिवे मारण्याचे प्रयत्न सुरू झाले. त्यांच्या शेतावर व घराजवळ संशयास्पद हालचाली, धमकी आणि काही स्थानिक इसमांकडून जातीयवादी अवहेलनाक्रुत शब्दांचे प्रयोग जाणून बुजून होत असल्याचे ते म्हणाले. यामुळे त्यांचे जिवन धोक्यात आले आहे. अनेकदा त्यांनी महसूल व पोलीस प्रशासनाकडे तक्रार केली, परंतु अद्याप कारवाई होत नाही.
प्रशासनाची निष्क्रिय भूमिका??
गेल्या तीन-चार वर्षांपासून झोरे यांच्या तक्रारींवर केवळ आश्वासने दिली जात आहेत. प्रत्यक्षात मात्र वाळू माफियांचा दबदबा वाढत असून, त्यांच्या मागे राजकीय पाठबळ असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
१५ ऑगस्टचे उपोषण – लढ्याचा नव्याने उगम..
झोरे यांनी जाहीर केले आहे की हे उपोषण तोपर्यंत सुरू राहील जोपर्यंत:
- अवैध वाळू उत्खननाची सखोल चौकशी होत नाही.
- दोषींवर कठोर कारवाई होत नाही.
- संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित होत नाही.
श्री. संतोषराव शिंदे यांचा प्रशासनाला इशारा..
"डिजीयुगंधरा" चे मुख्य संपादक व या अवैध वाळु प्रकरण लढ्याचे प्रणेते श्री. संतोषराव शिंदे यांनी या प्रकरणाची दखल घेत प्रशासनाला स्पष्ट इशारा दिला आहे. कारण या अगोदर देखील श्री. संतोषराव शिंदे यांनी अश्याच प्रकारे कारवाई करण्यासाठी आग्रही भुमीका घेतली असताना, तेव्हाही संबधीत प्रशासनाने थातूर मातूर कारवाईची नोंद व जप्ती दाखवून, प्रकरण मध्येच दुर्लक्षित केलं आणि प्रशासनातील काही आधिका-यांचे निश्क्रीयतेमुळे अश्या अवैथ घटणांना पुनः जोर धरत आहे. त्यांनी सांगितले की, अवैध वाळू उत्खनन, अवैध जंगलतोड आणि पर्यावरणाची हानी याविरोधात आम्ही पूर्वीही लढा दिला आहे आणि यापुढेही देणार आहोत. अशा बेकायदेशीर घटना केवळ नांदिवसेतच नव्हे तर संपूर्ण चिपळूण तालुक्यातून हद्दपार केल्या पाहिजेत. अन्यथा शिंदे यांनी स्पष्ट केले की, जर प्रशासनाने तात्काळ ठोस पावले उचलली नाहीत, तर आम्ही जनआंदोलनाच्या माध्यमातून हा लढा व्यापक करू व सर्वप्रथम त्या आधिक-यांची व त्यांच्या कार्यशैलीची चौकशी करून अश्या माफियांना वरदहस्त देणा-यांवर कायदेशीर कारवाई व्हावी यासाठी शासनाला सतर्क करू.
![]() |
Click करा आणि दररोज कमवा. |
"डिजीयुगंधरा" ने या आंदोलनाला शंभर टक्के पाठिंबा जाहीर केला आहे. "डिजीयुगंधराचे" मुख्यसंपादक व महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे कार्यकारीणी श्री संतोषराव शिंदे यांनी, हे स्पष्ट केले की हा लढा केवळ एका गावापुरता मर्यादित नाही, तर पर्यावरणाचे संरक्षण, कायदा-सुव्यवस्था आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आहे. कारण याचा परिणाम निसर्ग, पर्यावरणीय व सामाजिक घटकांवर होत आहे. त्यामुळे नदीपात्राचा नाश, पाणीपातळी घटणे, शेतजमीणींचा नाश, पाणीटंचाई, जैवविविधतेचा नाश, सामाजिक असुरक्षितता वाढणे अश्या विवीध घटना घडत आहेत. अश्या प्रकारच्या लढ्यामुळे नागरिकांची साथ वाढतेय. स्थानिक शेतकरी, पर्यावरणप्रेमी आणि सामाजिक कार्यकर्ते या लढ्यात सहभागी होण्याची तयारी दर्शवत आहेत. "डिजीयुगंधरा" प्रकाशित.
![]() |
Click and earn Passive Income |
If you have any query, please let me know.