![]() |
नांदिवसे शिमगा आदेश – न्यायालयीन सत्य व सांस्कृतिक हक्क |
न्यायालयीन आदेशाचे उर्वरित मुद्दे आणि मुख्य निकालाची (Order) नोंद: भाग -२
२३. प्रतिवादी क्रमांक १ व २ यांनी खालील न्यायनिर्णयांवर अवलंबून असल्याचे मांडले आहे –
Sinha Ramanuja Jeer Ranga Ramanuja Jeer, 1961 AIR (SC) 1720, 1962 (2) SCR 509
Koil Pillai विरुद्ध Territorial Command किंवा Territorial Head Quarters, Salvation Army, 1994 AIR (Mad) 27, 1993 (2) Mad.L.J. 117
न्यायालयाने वरील दाखल न्यायनिर्णयांचा अभ्यास केला असून त्यांचा गाभा असा आहे की –
“एखाद्या व्यक्तीस विशिष्ट मंदिरांमध्ये विशिष्ट उत्सवांदरम्यान इतरांच्या आधी पूजा करण्याचा, तसेच ‘थिरुनीरू’ (पवित्र भस्म) आणि ‘थीरथम’ (पवित्र पाणी) प्रथम मिळविण्याचा अधिकार आहे असा दावा हा, जोपर्यंत तो अधिकार एखाद्या धार्मिक पदाशी संलग्न सन्मान किंवा मानधनाच्या स्वरूपात जोडलेला नाही, तोपर्यंत नागरी हक्क मानला जाऊ शकत नाही आणि अशा प्रकारचा दावा नागरी न्यायालयात ग्राह्य धरला जाऊ शकत नाही.”
२४. माझ्या माननीय पूर्ववर्ती न्यायाधीशांनी (Ld. Predecessor) दिनांक Exh.134 वरून खालील मुद्दे निश्चित केले आहेत आणि या न्यायालयाने त्यांसह स्वतःचे निकाल खालीलप्रमाणे नोंदवले आहेत –
![]() |
Learn and Earn Money |
फिर्यादी सिद्ध करतात का की, त्यांना होळी उत्सव साजरा करण्याचा, तसेच सर्व धार्मिक विधी करण्याचा पारंपरिक हक्क आहे? ...होय (In the affirmative).
फिर्यादी सिद्ध करतात का की प्रतिवादी क्रमांक १ व २ यांनी त्यांना होळी उत्सव पार पाडण्यात अडथळा आणला? ...होय (In the affirmative).
फिर्यादींना त्यांच्या मागणीप्रमाणे कायमस्वरूपी बंदी आदेश (Permanent Injunction) देण्याचा हक्क आहे का? ...होय (In the affirmative).
४) फिर्यादींना त्यांच्या मागणीप्रमाणे तात्पुरता बंदी आदेश (Temporary Injunction) देण्याचा हक्क आहे का? ...होय (In the affirmative).
५) कोणता आदेश व डिक्री (फैसला)?...दावा मंजूर (The suit is decreed).
अतिरिक्त मुद्दे (Additional Issues):
१) हे न्यायालय हा दावा स्वीकारून त्यावर निर्णय देण्यास अधिकारप्राप्त आहे का? ...होय (In the affirmative).
१-अ) फिर्यादी सिद्ध करतात का की, त्यांना होळी उत्सव साजरा करण्यासाठी, तसेच सर्व धार्मिक विधी करण्यासाठी गावातील इतर कुणापूर्वी करण्याचा पारंपरिक प्राधान्याचा मान (customary preferential rights and respects) आहे? ...होय (In the affirmative).
१-ब) फिर्यादी सिद्ध करतात का की, तेच या दाव्याशी संबंधित सर्व गावे आणि मंदिरे यांचे एकमेव मालक व धारक (sole owners and possessors) आहेत? ...नाही (In the negative).
१-क) फिर्यादी सिद्ध करतात का की, हा दावा दाखल करण्याचा व न्यायालयाकडून जाहीर करून घेण्याचा त्यांना हक्क आहे की त्यांना होळी उत्सव व सर्व धार्मिक विधी करण्यासाठी पारंपरिक प्राधान्याचा मान (मान) मिळावा? ...होय (In the affirmative).
![]() |
Click here for your better media performance |
कारणे (REASONS):
२५. आपल्या दाव्याच्या समर्थनार्थ फिर्यादींनी एकूण पाच साक्षीदार तपासले आहेत. फिर्यादी क्रमांक १ म्हणजे जयवंत बाबुराव शिंदे (PW1) यांनी दाखल केलेले पुरावे – प्रदर्श क्रमांक 142 (जुना प्रदर्श102),
प्रकाश शंकरराव शिंदे (P W2) यांनी दाखल केलेले पुरावे – प्रदर्श क्रमांक 157 (जुना प्रदर्श117), संभाजी शिवराम कदम (PW3) यांनी दाखल केलेले पुरावे – प्रदर्श क्रमांक 169 (जुना प्रदर्श129), रघुनाथ बरकू साकपाल (PW4) यांनी दाखल केलेले पुरावे – प्रदर्श क्रमांक 171 (जुना प्रदर्श131), वसंत गणपती कदम (PW5) यांनी दाखल केलेले पुरावे – प्रदर्श क्रमांक 175 (जुना प्रदर्श135). फिर्यादींनी पुराव्याची नोंद पूर्ण झाल्याची पुरसिस प्रदर्श क्रमांक 177 (जुना प्रदर्श137) दाखल केली आहे.
२६. फिर्यादी खालील कागदपत्रांवर अवलंबून आहेत:
प्रदर्श 75:– दैनिक 'प्रहार' दिनांक 17/03/2012 मध्ये प्रकाशित केलेल्या नोटिशीची प्रत.प्रदर्श 152 (जुना प्रदर्श112):– तहसीलदार, चिपळूण यांनी 2011 ते 2016 दरम्यान दिलेल्या आदेशांच्या प्रमाणित प्रती.प्रदर्श 153 (जुना प्रदर्श113):– उपविभागीय अधिकारी, चिपळूण यांनी 2010, 2013 ते 2016 या काळातील आदेशांच्या प्रमाणित प्रती. प्रदर्श 165 (जुना प्रदर्श125):– तहसीलदार, चिपळूण यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 144 अंतर्गत 21/03/2016 रोजी दिलेल्या आदेशाची प्रमाणित प्रत.प्रदर्श 166 (जुना प्रदर्श126):– उपविभागीय अधिकारी, चिपळूण यांनी क. एमएजज/रिव्हिजन/एसआरि/01/2016 दिनांक 22/03/2016 रोजी दिलेल्या आदेशाची प्रमाणित प्रत. प्रदर्श 174 (जुना प्रदर्श134):– ग्राम नांदिवसे, ता. चिपळूण येथे आयोजित श्री कालभैरव जन्मोत्सवाचे निमंत्रणपत्र. प्रदर्श 201 (जुना प्रदर्श161):– मंदिरातील दागिन्यांसंबंधी अंदाजपत्रकाचे स्मरणपत्र (Memorandum of estimates). प्रदर्श 202 (जुना प्रदर्श162):– ग्राम नांदिवसे येथील जानाई-वाघजई मंदिराचा फेर्फार क्रमांक 1 याची प्रमाणित प्रत. प्रदर्श 203 (जुना प्रदर्श163): – ग्राम नांदिवसे येथील फेरफार नोंद क्रमांक 1206 ची उतारा प्रत. प्रदर्श 206 (जुना प्रदर्श166):– 16/12/2001 रोजीच्या नोंदणी वहीतील पान क्रमांक 6 व त्यासोबतची वहीची प्रत.
२७. प्रतिवादींच्या बाजूने पुरावे:
प्रतिवादींनी आपल्या दाव्याच्या समर्थनार्थ दोन साक्षीदार तपासले आहेत.
प्रतिवादी क्र.1 अनंत लक्ष्मण जंगम (DW1) – प्रदर्श क्रमांक 188 (जुना प्रदर्श148). प्रतिवादी क्र.2 वसंत सखाराम जीमन (DW2) – प्रदर्श क्रमांक 207 (जुना प्रदर्श167). प्रतिवादी क्र.1, 2, 4 ते 156 यांनी प्रदर्श क्रमांक 219 (जुना प्रदर्श179), प्रतिवादी क्र.3 यांनी प्रदर्श क्रमांक 180 (जुना प्रदर्श140) दाखल केले आहेत. प्रतिवादी क्र.1 व 2 यांनी आपला पुरावा बंद करण्याची पुरसिस प्रदर्श क्रमांक 252 दाखल केली असून, प्रतिवादी क्र.3 यांनी पुरावा बंद करण्याची पुरसिस प्रदर्श क्रमांक 253 दाखल केली आहे.
२८. प्रतिवादी क्र.1 व 2 यांचे आधारभूत कागदपत्रे:
प्रदर्श 189 (जुना प्रदर्श149):– भूपण क्रमांक 173, ग्राम नांदिवसे, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी याचा 7/12 उतारा – ज्यात महाराष्ट्र राज्य मालक असल्याचे दर्शविले आहे.
प्रदर्श 190 (जुना प्रदर्श150): – भूपण क्रमांक 48, ग्राम नांदिवसे, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी याचा 7/12 उतारा – ज्यात श्रीदेव शंकर मालमत्तेचा धारक असल्याचे दाखविले आहे.
प्रदर्श 191 (जुना प्रदर्श151):– गट क्रमांक 395, ग्राम नांदिवसे, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी याचा 7/12 उतारा –ज्यात श्रीदेव जनई-वाघजई हे शिंदे कुटुंबासह धारक असल्याचे नमूद आहे.
Exh.19 (जुना प्रदर्श 152) गाव नांदिवसे, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी येथील भुमापन क्र. 531 चा 7/12 उताऱ्याची प्रमाणित प्रत, ज्यामध्ये समूह ग्रामपंचायत नांदिवसे ही सदर मालमत्तेची धारक (ताबेदार) असल्याचे दर्शविले आहे.
Exh.193 (जुना प्रदर्श 153) गाव स्वयंदेव, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी येथील फेरफार नोंद क्र. 94 ची प्रमाणित प्रत, ज्यामध्ये श्रीदेव शंकर हे सदर मालमत्तेचे धारक असल्याचे दर्शविले आहे.
Exh.194 (जुना प्रदर्श 154) माननीय जिल्हा न्यायालय-२ खेड येथे प्रलंबित सिव्हिल मिस्ल. अर्ज क्र. 40/2005 मधील प्रदर्श 38 ची प्रमाणित प्रत.
Exh.195 (जुना प्रदर्श 155) माननीय जिल्हा न्यायालय-२ खेड येथे प्रलंबित सिव्हिल मिस्ल. अर्ज क्र. 43/2005 मधील प्रदर्श 38 ची प्रमाणित प्रत.
Exh.196, (जुना प्रदर्श 156) श्री स्वयंदेव शंकर मंदिराच्या नोंदणी प्रमाणपत्राची प्रमाणित प्रत, जी सहाय्यक धर्मादाय आयुक्त, रत्नागिरी यांनी दिली आहे.
Exh.197 (जुना प्रदर्श 157) गाव स्वयंदेव, ता. चिपळूण येथील श्री स्वयंभू शंकर मंदिराच्या नोंदींचा उतारा.
Exh.235 माननीय मुंबई उच्च न्यायालयाने रिट पिटीशन क्र. 25/2018 मध्ये दिनांक 11-07-2018 रोजी दिलेल्या आदेशाची खरी प्रत.
अतिरिक्त मुद्दा क्र. 1 संदर्भात:
29. सिव्हिल प्रक्रिया संहितेच्या कलम 9 नुसार, एखादे प्रकरण सिव्हिल न्यायालयात चालविण्याचा अधिकार असतो, जोपर्यंत ते प्रकरण कायद्यानुसार बंदी घातलेले नाही. सिव्हिल न्यायालयास प्रकरण चालविण्याचा अधिकार मिळण्यासाठी दोन अटी आवश्यक असतात –
(i) प्रकरण सिव्हिल स्वरूपाचे असावे;
(ii) त्या प्रकरणाच्या विचारास कायद्याने स्पष्ट किंवा अप्रत्यक्षरित्या बंदी घातलेली नसावी. ‘सिव्हिल’ हा शब्द संहितेत परिभाषित नाही, परंतु शब्दकोशातील अर्थानुसार..
हे खाजगी हक्क आणि नागरिकांच्या उपाययोजना यांच्याशी संबंधित असून ते गुन्हेगारी, राजकीय इत्यादींपासून वेगळे आहे. जर खटल्यामधील मुख्य प्रश्न हा कोणत्याही नागरी (सिव्हिल) हक्काच्या निर्धारण व अंमलबजावणीशी संबंधित असेल, तर तो खटला सिव्हिल स्वरूपाचा (Civil Nature) समजला जातो. खटल्यातील पक्षकारांचा दर्जा (Status) नव्हे, तर खटल्याचा विषय (Subject Matter) ठरवितो की खटला सिव्हिल स्वरूपाचा आहे की नाही. 'सिव्हिल स्वरूपाचा खटला' ही संज्ञा नागरिकांच्या खाजगी हक्क व जबाबदाऱ्या यांना व्यापते. सद्य खटल्यामध्ये, न्यायालयासमोरचा मुख्य प्रश्न असा आहे की फिर्यादींना होळी उत्सवासह सर्व धार्मिक विधी पार पाडण्याचा परंपरागत (customary) हक्क आहे का? हा हक्क नागरी (सिव्हिल) हक्काशी संबंधित आहे. या न्यायालयाच्या मते, हा हक्क निश्चित करण्याचा आणि त्यावर निर्णय देण्याचा अधिकार या न्यायालयास आहे. त्यामुळे फिर्यादींच्या नागरी हक्कांचा विचार होत असल्याने हे न्यायालय हा खटला ऐकून निकाल देऊ शकते.
तसेच, माझ्या माननीय पूर्वाधिकारी न्यायाधीशांनी सिव्हिल प्रक्रीया संहितेच्या कलम 80 अंतर्गत नोटीस देण्याची माफी (exemption) Exh-8 द्वारे दिली आहे. त्यामुळे फिर्यादींनी कलम 80 अंतर्गत नोटीस दिली नाही असे म्हणता येणार नाही. या परिस्थितीत, न्यायालयाने अतिरिक्त मुद्दा क्रमांक 1 (Additional Issue No.1) ला सकारात्मक उत्तर दिले आहे. मुद्दे क्र. 1 ते 5 व अतिरिक्त मुद्दे 1-A, 1-B, 1-C याबाबत: न्यायालय मुद्दे क्र. 1 ते 4 यांचे एकत्रित उत्तर देत आहे कारण हे मुद्दे एकमेकांशी संबंधित आहेत आणि तथ्यांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी एकत्र विचार करणे आवश्यक आहे. जयवंतराव (PW1) यांच्या साक्षीवरून हे समोर आले आहे की त्यांनी हा खटला संपूर्ण शिंदे कुटुंबाच्या वतीने प्रतिनिधी स्वरूपात दाखल केला आहे. माझ्या माननीय पूर्वाधिकारी न्यायाधीशांनी Exh-9 वरील आदेशाद्वारे हा मुद्दा खुला ठेवला आहे की, सिव्हिल प्रक्रिया संहितेच्या आदेश 1 नियम 8 (Order 1 Rule 8 CPC) अंतर्गत केलेला अर्ज हा, न्यायालयाच्या अधिकारक्षेत्रावरील (jurisdiction) मुद्दा ठरल्यानंतर विचारात घेतला जाईल, जो खटल्याच्या नोंदणीदरम्यान खुला ठेवण्यात आला होता.
या न्यायालयाने आधीच अतिरिक्त मुद्दा क्र. 1 (Additional Issue No.1) ला सकारात्मक उत्तर दिले आहे की हा खटला ऐकण्याचा आणि निर्णय देण्याचा अधिकार या न्यायालयास आहे.
त्यामुळे हे न्यायालय ठरवते की, सर्व शिंदे कुटुंबांच्या वतीने सिव्हिल प्रक्रिया संहितेच्या आदेश 1 नियम 8 अंतर्गत खटला दाखल करण्याचा अधिकार फिर्यादीकडे आहे.
32. जयवंतराव (PW1) यांच्या साक्षीतून असे स्पष्ट झाले आहे की, प्रतिवादी क्र. 1 हा जंगम समाजाचा असून प्रतिवादी क्र. 2 हा कुणबी समाजाचा आहे आणि ते त्यांच्या संबंधित समाजाचे नेते आहेत.
हे प्रतिवादी शिंदे कुटुंबांच्या देवस्थानातील कार्यात अडथळे निर्माण करतात आणि कधी कधी त्यांनी फिर्यादींशी उद्धट वर्तन केले आहे. म्हणूनच, प्रतिवादी क्र. 1 आणि 2 हे त्यांच्या संबंधित समाजाचे नेते असल्यामुळे त्यांना इतर प्रतिवादींबरोबर खटल्यात प्रतिवादी क्र. 1 आणि 2 म्हणून समाविष्ट केले आहे. जयवंतराव (PW1) यांच्या साक्षीतून असेही समोर आले आहे की, शिंदे कुटुंबांना त्यांच्या गावात होळी उत्सव साजरा करण्याचा परंपरागत हक्क आहे.
33. जयवंतराव (PW1) यांनी प्लेंट (plaint) च्या परिच्छेद 8 मध्ये नमूद केल्याप्रमाणे होळी उत्सव साजरा करण्याची प्रथा साक्षीने सिद्ध केली आहे. जयवंतराव (PW1) यांची साक्ष प्रकाश (PW2), संभाजी (PW3), रघुनाथ (PW4), वसंत (PW5) यांनी पुष्टी केली आहे. प्रतिवादींनी जयवंतराव (PW1), प्रकाश (PW2), संभाजी (PW3), रघुनाथ (PW4), वसंत (PW5) यांची उलटतपासणी (cross-examination) केली आहे. PW5 – परंतु प्रतिवादींनी वरील साक्षीदारांची साक्ष खोडून काढण्याकरिता किंवा शिंदे कुटुंबांना होळी उत्सव व त्यातील सर्व धार्मिक विधी पार पाडण्याचा हक्क नाही हे सिद्ध करण्याकरिता कोणताही ठोस पुरावा न्यायालयाच्या नोंदीवर आणलेला नाही. प्रतिवादींनी फक्त फिर्यादी आणि त्यांचे साक्षीदार यांनी केलेले आरोप नाकारले आहेत.
34. जयवंतराव (PW1) यांनी आपल्या उलटतपासणीमध्ये 1981 पासून शिंदे कुटुंब आणि गावकरी यांच्यात देवळांच्या मालकीसंदर्भातील वाद सुरू आहे हे मान्य केले आहे. तसेच, जयवंतराव (PW1) यांनी उलट तपासणीमध्ये 1981 पासून वादामुळे त्यांच्या गावात शिमगा उत्सव साजरा होत नाही हा आरोप नाकारला आहे.
फिर्यादींनी नोंदीवर दाखल केले आहेत –
फौजदारी अपील क्र. 1/2010, दिनांक 21-03-2016 रोजी, उपविभागीय अधिकारी, चिपळूण, जि. रत्नागिरी यांनी दिलेला आदेश hi(Exh-152, जुना Exh-112). फौजदारी अपील क्र. 1/2010, दिनांक 21-03-2016 रोजी, उपविभागीय अधिकारी, चिपळूण, जि. रत्नागिरी यांनी दिलेला आदेश (Exh-153, जुना Exh-113).
35. प्रकाश (PW2) यांनी आपल्या उलटतपासणीमध्ये मान्य केले आहे की 1981 पासून शिंदे कुटुंब आणि गावकरी यांच्यात देवळांच्या मालकीसंबंधी वाद सुरू आहे.
36. संभाजी (PW3) यांनी आपल्या उलटतपासणीमध्ये मान्य केले आहे की, अत्यंत प्राचीन काळापासून गावांतील मंदिरे अस्तित्वात आहेत, आणि शिंदे कुटुंब नांदिवसे गावात इ.स. 1924 मध्ये आले आहे. (टीप: हे साक्षीत नोंदवली गेलेली साल माझे मते चुकीच असावं किंवा साल नोंदविण्यामध्ये टायपिंग त्रुटी असू शकते.. कारण नांदिवसे गावाची स्थापना भाऊबंदकी मधून १६२० ते १६३० या काळात श्रीमंत कै. सोमजीराव बाबाजीराव शिंदे यांनी केली होती.)
३७.रघुनाथ (PW4) आणि वसंत कदम (PW5) यांनी त्यांच्या उलटतपासणीदरम्यान हे मान्य केले आहे की, गावातील मंदिरे प्राचीन काळापासून अस्तित्वात आहेत तसेच शिमगा उत्सव देखील त्या गावात अनादी काळापासून साजरा होत आहे.
३८. अनंत (DW1) याची फिर्यादी पक्षाने सखोल उलटतपासणी केली. अनंत (DW1) यांनी त्यांच्या उलटतपासणीदरम्यान हे मान्य केले की, त्यांचे पूर्वज यांनी R.C.S. क्र. 289/1934 असा एक दावा दाखल केला होता, परंतु त्या दाव्यात शिंदे कुटुंब पक्षकार नव्हते. अनंत (DW1) यांनी हेही मान्य केले की, त्यांनी स्वतः व इतर गावकऱ्यांनी शिंदे कुटुंबांविरुद्ध माननीय उच्च न्यायालयात अनेक कार्यवाही दाखल केल्या आहेत.
तसेच अनंत (DW1) यांनी कबूल केले की, सन 2004 मध्ये उपविभागीय अधिकारी, चिपळूण यांच्या मार्गदर्शनाखाली होळी उत्सव साजरा झाला होता.
अनंत (DW1) यांनी हेही मान्य केले की, शिमगा उत्सवाच्या वेळी (08-03-2004 रोजी) अलोरे पोलीस ठाण्यात दंगल आणि चोरीबाबत गुन्हा क्र. 8/2004 त्यांच्या व इतर गावकऱ्यांविरुद्ध दाखल झाला होता.
अनंत (DW1) यांनी त्यांच्या उलटतपासणी दरम्यान हे देखील कबूल केले की, 14-03-2005 रोजी फिर्यादी आणि प्रतिवादी यांच्यात शिमगा अथवा होळी उत्सवाच्या साजरीकरणाबाबत एक समझोता करारनामा करण्यात आला होता.
प्रदर्श १९६ (जुना प्रदर्श १५६) नुसार, श्री स्वयंमदेव शंकर मंदिर, स्वयंमदेव, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी हे सहाय्यक धर्मादाय आयुक्त, रत्नागिरी विभाग, रत्नागिरी यांच्याकडे नोंदणीकृत असून त्या संदर्भात १०-०८-२००१ रोजी अनंत (DW1) यांच्या नावावर नोंदणी प्रमाणपत्र जारी करण्यात आले होते.
39. वसंत जीमन (DW2) यांनी त्यांच्या प्रतिपरीक्षणात हे मान्य केले की ते पुण्यात कुंनबी सहकारी बँकेत क्लर्क पदावर नोकरी करत होते आणि त्यांनी 1981 साली नोकरीचा राजीनामा देऊन चिपळूण तालुक्यातील नांदिवसे गावात स्थलांतर केले. वसंत जीमन (DW2) यांनी हेही मान्य केले की 2004 साली चिपळूण पोलिस स्टेशनने त्यांच्यावर आणि इतर गावकऱ्यांवर भारतीय दंडसंहितेच्या कलम 144, 307, 379 अंतर्गत गुन्हा क्रमांक 8/2004 नोंदवला होता. वसंत जीमान (DW2) यांनी प्रतिपरीक्षणात पुढे मान्य केले की त्यांच्या गावात फिर्यादी आणि प्रतिवादी यांच्यात मान-सन्मान (मानापमान ) यावरून वाद सुरू आहे. त्यांनी हेही मान्य केले की या परिस्थितीतून गावात दोन गट निर्माण झाले असून, होळी किंवा शिमगा उत्सवाच्या वेळी गावातील शांतता राखण्यासाठी सरकारकडून प्रतिबंधात्मक कारवाई केली जाते.
40. जयवंतराव (PW1), प्रकाश (PW2), संभाजी (PW3), रघुनाथ (PW4) आणि वसंत कदम (PW5) यांच्या वरील साक्षीच्या आधारे स्पष्ट होते की त्यांच्या पूर्वजांच्या काळापासून गावात एक प्रथा चालत आली आहे – होळी किंवा शिमगा साजरा करताना गावकरी प्रथम मान (सन्मान) शिंदे कुटुंबाला देतात. हा मुद्दा फिर्यादींनी त्यांच्या फिर्यादीतील पॅरा क्रमांक 8 मध्ये सविस्तर नमूद केला आहे.
अनंत (DW1) आणि वसंत जीमन (DW2) यांनी प्रतिपरीक्षणात हे मान्य केले की चिपळूण पोलिस स्टेशनने 2004 साली गुन्हा क्रमांक 8/2004 अंतर्गत कलम 144, 307, 379 नुसार त्यांच्यावर आणि इतर गावकऱ्यांवर गुन्हा नोंदवला होता. प्रदर्श क्रमांक 152 आणि 153 मधून हे स्पष्ट होते की नांदिवसे गावात दोन गट अस्तित्वात आहेत.एका गटात शिंदे कुटुंब असून दुसरा गट प्रतिवादींच्या कुटुंबाचा आहे आणि हा तथ्य प्रतिवादींनी त्यांच्या प्रतिपरीक्षणात मान्य केलेला आहे. या न्यायालयास फिर्यादी व त्यांच्या साक्षीदारांच्या साक्षीमध्ये ठोसपणा आढळतो की, फिर्यादी म्हणजे शिंदे कुटुंबांना नांदिवसे व स्वयंमदेव (ता. चिपळूण, जि. रत्नागिरी) येथे होळी सणासह सर्व धार्मिक विधी पार पाडण्याचा पारंपरिक हक्क आहे. त्यामुळे या न्यायालयाने मुद्दा क्रमांक 1, अतिरिक्त मुद्दा क्रमांक 1-अ आणि 1-क यांना सकारात्मक उत्तर दिले आहे.
41.वरील साक्षीनुसार स्पष्ट होते की प्रतिवादी क्र. 1 व 2 यांनी शिंदे कुटुंबाला होळी सण साजरा करण्यापासून अडविले आहे आणि हा तथ्य प्रदर्श क्रमांक 152 व 153 मधूनही स्पष्टपणे दिसून येतो. या साक्षीवरून हे देखील उघड होते की, प्रतिवादी होळी किंवा शिमगा सणाच्या वेळी फिर्यादींना अडथळा करतात आणि त्यामुळे चिपळूण तहसीलदार तसेच प्रांत अधिकारी यांनी वेळोवेळी त्यांच्यावर प्रतिबंधात्मक आदेश दिले आहेत. या साक्षीवरून हे सिद्ध होते की फिर्यादींनी प्रतिवादी क्र. 1 व 2 यांनी होळी साजरी करण्यास अडथळा आणल्याचे सिद्ध केले आहे. त्यामुळे या न्यायालयाने मुद्दा क्रमांक 2 ला सकारात्मक उत्तर दिले आहे.
42.प्रदर्श क्रमांक 196 (जुना प्रदर्श 156) वरून हे स्पष्ट होते की श्री स्वयंमदेव शंकर मंदिर, स्वयंमदेव, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी हे सहाय्यक धर्मादाय आयुक्त, रत्नागिरी विभाग यांच्याकडे नोंदणीकृत आहे. त्या संदर्भात सहाय्यक धर्मादाय आयुक्त, रत्नागिरी विभाग यांनी अनंत (DW1) यांना नोंदणी प्रमाणपत्र 10-08-2001 रोजी दिले आहे. 10-08-2001 या साक्षीवरून हे स्पष्ट होते की फिर्यादी हे स्वयंमदेव शंकर मंदिर, स्वयंमदेव, ता. चिपळूण, गावे नांदिवसे येथील मंदिराचे मालक नाहीत. त्या परिस्थितीत, या न्यायालयाने अतिरिक्त मुद्दा क्र. 1-ब ला नकारात्मक उत्तर दिले आहे.
43. या न्यायालयाने यापूर्वीच मुद्दा क्र. 1 व 2 ला सकारात्मक उत्तर दिले असून, फिर्यादींना इतर गावकऱ्यांपूर्वी होळी किंवा शिमगा सणाच्या वेळी पूजेचा सन्मानाने हक्क आहे, जो प्रथेनुसार आहे, असे मान्य केले आहे. त्यामुळे या न्यायालयाने मुद्दा क्र. 3 ला सकारात्मक उत्तर दिले आहे.
म्हणूनच प्रतिवादी क्र. 1, 2, 4 ते 54, 56 ते 58, 60 ते 127, 129 ते 150 आणि त्यांचे अनुयायी व समर्थक ज्यांनी दंगलखोर परिस्थिती निर्माण करून, शिंदे कुटुंबाला होळी किंवा शिमगा सण साजरा करण्यापासून अडथळा आणण्याचा प्रयत्न केला आहे, त्यांना कायमस्वरूपी प्रतिबंधित केले जाते. माझ्या माननीय पूर्वाधिकारी न्यायाधीशांनी तात्पुरती स्थगिती अर्ज (प्रदर्श क्र. 6) दिनांक 25-02-2010 रोजी मंजूर केली होती. त्या परिस्थितीत, या न्यायालयाने मुद्दा क्र. 3 व 4 ला सकारात्मक उत्तर दिले आहे.
![]() |
Click here for better media performance |
44. फिर्यादी आणि प्रतिवादी यांनी आपापल्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी न्यायालयीन लढा दिला आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांना त्यांचे स्वतःचे खर्च स्वतःच उचलण्याचे निर्देश दिले जात आहेत.
त्यामुळे, मुद्दा क्र. 5 च्या उत्तरादाखल हे न्यायालय खालीलप्रमाणे आदेश देते :
O R D E R
- फिर्याद मंजूर केली जाते.
- फिर्यादी म्हणजे शिंदे कुटुंबियांना फिर्यादीतील परिच्छेद क्र. 8 मध्ये नमूद केल्याप्रमाणे, गाव नांदिवसे व स्वयंमदेव, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी येथे होळी किंवा शिमगा उत्सव तसेच त्यासंबंधित सर्व धार्मिक विधी पार पाडण्याचा प्रथेनुसार हक्क आहे.
- प्रतिवादी क्र. 1, 2, 4 ते 54, 56 ते 58, 60 ते 127, 129 ते 150 किंवा त्यांच्यामार्फत हक्क सांगणारे त्यांचे अनुयायी वा समर्थक, जे शिंदे कुटुंबास गाव नांदिवसे व स्वयंमदेव, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी येथे होळी किंवा शिमगा उत्सव साजरा करण्यापासून रोखण्यासाठी दंगलखोर परिस्थिती निर्माण करतात, त्यांना कायमस्वरूपी प्रतिबंधित करण्यात येते.
- प्रतिवादी क्र. 3 यास निर्देश दिले जातात की, प्रत्येक होळी किंवा शिमगा उत्सवाच्या वेळी गाव नांदिवसे व स्वयंमदेव, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी येथे फिर्यादी म्हणजे शिंदे कुटुंबियांचे हक्क संरक्षित राहावेत आणि प्रथेनुसार (फिर्यादी परिच्छेद क्र. 8 मध्ये नमूद) कार्यक्रम निर्विघ्नपणे पार पाडता यावेत, तसेच समाजातील शांतता टिकून राहावी यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात.
- त्यानुसार डिक्री काढण्यात यावी.
दि.: 08/08/2020 (मा. श्री. ग.ज.श्रीसुंदर) ठिकाण : खेड, रत्नागिरी सिव्हिल ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट (वरिष्ठ विभाग), खेड, जि. रत्नागिरी. नियमित दिवाणी खटला क्र. 04/2018 (जुना नियमित दिवाणी खटला क्र. 39/2010) मी याची खात्री देतो की या पीडीएफ फाईलमधील निर्णय/आदेश यातील मजकूर हा मूळ निर्णय/आदेशातील शब्दांप्रमाणेच आहे. शिपाई (स्टेनोग्राफर) यांचे नाव : आर. के. सांगरे. न्यायालयाचे नाव : दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ विभाग, खेड, रत्नागिरी. निर्णयाची तारीख : 08/08/2019. निर्णय/आदेश P.O. (Presiding Officer) यांनी स्वाक्षरी केलेली तारीख : 08/08/2019. निर्णय/आदेश अपलोड केलेली तारीख : 08/08/2019.
उपरोक्त, दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ विभाग, खेड, रत्नागिरी. यांनी इंग्रजीत दिलेल्या न्यायालयीन आदेशाचे अभ्यासपूर्ण मराठी अनुवाद, ‘श्री. संतोषराव पांडुरंगराव शिंदे’ यांनी केले आहे.
अस्वीकरण (Disclaimer):
या लेखातील नांदिवसे शिमगा आदेशाचा मराठी अनुवाद हा फक्त माहिती व अध्ययनासाठी आहे. मूळ न्यायालयीन आदेश हेच अंतिम व प्रमाणित स्वरूप मानले जाईल. अधिकृत कायदेशीर बाबींसाठी मूळ आदेशाचा संदर्भ घ्यावा.
तुमचे मत:
या प्रकरणाबाबत आपले विचार आणि प्रश्न कमेंट बॉक्समध्ये जरूर शेअर करा.
If you have any query, please let me know.