दोन वर्षांत एकाच रस्त्याचे दोनदा काम? नांदिवसे धनगरवाडी, ता. चिपळूण, जिल्हा रत्नागिरी, रस्ता प्रकरणात भ्रष्टाचाराचा आरोप — गावात तणाव वाढतोय.

डिजीयुगंधरा (DgYugandhara)
0



नांदिवसे, चिपळूण रस्ता घोटाळा उघड!
डिजीयुगंधराचा भ्रष्टाचार पर्दाफाश..
DgYugandhara प्रकाशित,    नांदिवसे (ता. चिपळूण, जि. रत्नागिरी): नांदिवसे ग्रामपंचायत हद्दीतील धनगरवाडी रस्ता कामावरून मोठा वाद निर्माण झाला असून गावात तणावाचे वातावरण आहे. त्याचे कारण म्हणजे, ग्रामसेवक, उपसरपंच व काहि ग्रामस्थ यांचे मते दोन वर्षांपूर्वी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून हा रस्ता पूर्ण झाल्याची नोंद ग्रामपंचायतच्या अभिलेखांमध्ये असताना, आता पुन्हा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून त्याच रस्त्याचे नवीन काम सुरू करण्यात आले आहे का? असे असेल तर त्या आधी २०२३ ला मुख्यमंत्री सडक योजने अंतर्गत संमत झालेला हा  रस्ता, शासनाचे नियमा प्रमाणे १५ दिवसात काम सुरू करुन, शासनाने दिलेल्या मर्यादित कालावधीत त्याचे काम पुर्ण होणे, हे बंधनकारक असताना, या तीन वर्षांचे कालावधीत हे रसत्याचे काम चालूच झाले नाही आणि अचानक ग्रामपंचाय व ग्रामस्थाना कोणतीही पुर्व सुचना न देता कंत्राटदाराने जिल्हापरिषदेचे नावाने काम सुरू केल्याने गावात संभ्रमाचे वातावरण असून,   शासनाच्या निधीचा दुरुपयोग आणि कंत्राटी लॉबीशी संबंधित भ्रष्टाचाराचा संशय आहे.

स्थानिक नागरिकांच्या माहितीनुसार, नव्याने सुरू असलेल्या रस्ता कामासाठी कोणतीही सूचना, गावसभा मंजुरी, कामाचे स्वरूप अथवा कार्यादेश दाखवण्यात आलेला नाही. ठेकेदार आणि उपठेकेदारांकडून कामाचे कागदपत्र मागण्यात आले असता, ग्रामस्थाना ते देण्यास नकार देण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे ठेकेदाराकडून जोपर्यंत संबंधित कागदपत्रांची पुर्तता होत नाही, तोपर्यत काही स्थानिक ग्रामस्थानी काम करण्यास रोख आणला होता. परंतु तदनंतर गावचे सरपंच, उपसरपंच, तंटामुक्ती अध्यक्ष, पोलिस पाटील आणि ग्रामसेवक गावडे या मंडळींच्या मध्यस्थीने संबंधित ठेकेदाराने ग्रामपंचायतीत सर्व कागदपत्र जमा केल्याचे कळल्याने, तुर्तास त्या कामास नांदिवसे सरपंच व ग्रामसेवक यांनी कंत्राटदारास रस्त्याचे काम करण्यास परवानगी दिली आहे. परंतु संबधित कामाचे कागदपत्र अर्धवट व बनावट असल्याचे देखील काही ग्रामस्थानी संशय व्यक्त केला आहे. असे असताना देखील कंत्राटदाराने व संबंधीत प्रशासनीक यंत्रणेने चुप्पी साधली असून, या संदर्भात नागरीकांना कोणतीही माहीती देण्यास ग्रामपंचायतीने देखील तुर्तास नकार दिला आहे. त्यामुळे या धनगरवाडी रस्त्याचे बांधकामात भ्रष्टाचार होत असल्याची शंका काही नागरीक व रस्त्यासाठी जमीन दिलेल्या शेतक-याना वाटत आहे. कारण काही शेतक-यांचे असे आरोप आहे की, त्यांच्या बनावट सह्या करून शेतक-याची नाहरकत पत्रे बणवली गेली असल्याचा देखील गंभीर आरोप होत आहे. संबंधित रस्त्याचे पेपर ग्रामपंचायतीत जमा केले असले तरी, ते सार्वजनिक करण्यास ग्रामपंचायत टाळाटाळ करीत आहे.

Click and Buy
याप्रकरणी ग्रामस्थांपैकी काहींनी असा आरोप केला आहे की, गावातील इतर रस्त्यांसाठी आलेला निधी धनगरवाडी रस्त्याकडे वळविण्यात आला असून त्याच कारणामुळे कंत्राटदार संबंधित कागदपत्रे दाखवत नाही. याविरोधात आवाज उठवणाऱ्या 'डिजीयुगंधरा चे मुख्य संपादक' व 'महाराष्ट्र कामगार सेनेचे उपाध्यक्ष' श्री. संतोषराव शिंदे यांच्या विरोधात चुकीची माहिती पसरवून “रस्त्याला अडथळा आणला जात आहे” असा कथित प्रचार केल्याचेही पुढे आले आहे. त्यामुळे विकासकामे लपविण्यासाठी आणि लोकांच्या भावना भडकवून भ्रष्टाचार दडपण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा दावा काही ग्रामस्थांनी केला आहे.

दरम्यान, शेतजमिनीवर काही शेतक-याना कोणतीही पूर्वसूचना न देता यंत्रसामग्रीने मार्ग तयार करण्याची प्रक्रिया सुरू झाल्याने शेतकऱ्यांत नाराजी आहे. शासनाच्या नियमानुसार रस्ता काम सुरू करण्यापूर्वी जमीनसंबंधी दस्तऐवज, ग्रामसभा संमती, कामगारांचे विमा तसेच योजनेचे अधिकृत अंदाजपत्रक नागरिकासाठी उपलब्ध करून देणे बंधनकारक असताना या सर्व टप्प्यांना वळसा घालण्यात आला असल्याचे प्रथम दर्शनी निदर्शनास येत आहे.

या प्रकरणात शासन निधीचा दुरुपयोग, अनधिकृत जमीन ताबा आणि माहिती दडपण्याचा गंभीर आरोप होत असून, शेतक-यांकडून चिपळूण तहसिलदार, वनखाते चिपळूण, नांदिवसे ग्रामपंचायत, शिरगांव पोलीस ठाणे इ. कडे तक्रार नोंदविण्यात आली आहे. त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करण्याची तयारी सुरू आहे. नागरिक RTI (माहिती अधिकार) अंतर्गत दस्तऐवज मागविणार असून सत्य बाहेर आल्यानंतर पुढील आंदोलन आणि कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे देखील माहिती यात जमिनी गेलेल्या गावक-यांकडून  मिळत आहे.

प्रकरणाची गंभीरता लक्षात घेता यावेळेस तरी, जिल्हा प्रशासन आणि ग्रामीण विकास खात्याची याप्रकरणाची तपासणी सुरू होते का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Select Your Budget Travel



 

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

If you have any query, please let me know.

टिप्पणी पोस्ट करा (0)
https://www.effectivegatecpm.com/i753t25bv?key=4e88fd94f666800bc06717f96dec2dac