महाराष्ट्रातील सर्वोत्तम मालवणी, कोकणी आणि मत्स्याहारी हॉटेल्स – एक संपूर्ण मार्गदर्शक

डिजीयुगंधरा (DgYugandhara)
0
    

 DgYugandhara प्रकाशित: "मुंबई, ठाणे, पुणे, कोल्हापूर व कोकणातील सर्वोत्तम मालवणी, कोकणी व मत्स्याहारी हॉटेल्सची संपूर्ण माहिती. फिश थाळी, मटण-चिकन व अस्सल कोकणी चवीचे मार्गदर्शन."

महाराष्ट्र म्हणजे विविध खाद्यसंस्कृतींनी नटलेली भूमी. कोकणातील मालवणी चव, कोल्हापूरचे झणझणीत तांबडा-पांढरा रस्सा, पुण्यातील शाकाहारी-मांसाहारी फ्यूजन, मुंबईतील अस्सल कोकणी मेजवानी आणि ठाणे-अंबरनाथ बेल्टमधील खास खानावळी – या सर्व ठिकाणांना भेट देताना खाद्यसंस्कृती हा प्रवासाचा अविभाज्य भाग ठरतो.

आज आपण पाहणार आहोत मुंबई, ठाणे, चिपळूण, रत्नागिरी, कोल्हापूर आणि पुण्यातील सर्वोत्तम व प्रसिद्ध मालवणी-कोकणी आणि मत्स्याहारी हॉटेल्सची विस्तृत माहिती.


१. मुंबईतील कोकणी–मालवणी खाद्यसंस्कृती:

मुंबईमध्ये असंख्य चवींचे ठिकाणे आहेत, पण मालवणी व गोमंतक चवीसाठी काही ठिकाणे खास आहेत.

  • समर्थ भोजनालय: गिरगाव, गिरगावातील हे छोटेसे पण लोकप्रिय भोजनालय मासेमारी आणि घरगुती चवीसाठी प्रसिद्ध आहे. ठाकुरद्वार बसस्टॉपवर उतरून “मिरबत लेन” विचारली की तुम्ही पटकन पोहोचाल. जागा शोधावी लागते, परंतु एकदा पोहोचलात की चवीची मेजवानी हमखास.
  • कोकण्यांची खानावळ: बांद्रा (E), Hotel Highway Gomantak, येथील फिश थाळी, सोलकढी आणि घरगुती मटणखोरांसाठी तर स्वर्गसुख! गुरुवारी बंद.
  • सायबिणः दादर, सेनाभवनच्या शेजारी असलेली ही घरगुती खानावळ दादरच्या मालवणी खाद्यसंस्कृतीचा गोड अनुभव देते.
  • गोमांतकः दादर, अस्सल मालवणी चव, प्रॉन्स फ्राय, तळलेला सुरमई – दादर गोमांतक म्हणजे मत्स्यप्रेमींसाठी आदर्श ठिकाण.
  • सिंधुदुर्गः शिवाजी पार्क, शिवाजी पार्क परिसरातील एक जुना, प्रामाणिक आणि चविष्ट पर्याय. पापलेट, कोळंबी आणि तांदळाची भाकरी अप्रतिम.
  • क्षीरसागरः लालबाग, उत्तम कोंबडी-वडे आणि सागुतीसाठी प्रसिद्ध. आयकर कार्यालयाजवळ.
  • योगीः सायन
  • वैशालीः चेंबुर, दोन्हीकडे चवीपेक्षा सेवा आणि सातत्य यामुळे गर्दी असते.
  • गजालीः पार्ले पूर्व,महाग असले तरी तंदुरी क्रॅब ही डिश इथली प्रसिद्ध ओळख. चवीवर प्रेम करणाऱ्यांनी इथे अवश्य भेट द्यावी.
  • ग्रँट हाऊसः व्हीटी / क्रॉफर्ड मार्केट, जुन्या मुंबईचा स्वाद. व्हीटी स्टेशनवरून बाहेर पडून मशीदबंदरकडे जा – कुणालाही विचारलं की मिळेल.
  • निलदुर्गः चेंबुर-गोवंडी रोड, खास मालवणी थाळीसाठी प्रसिद्ध.

२. ठाण्यातील लोकप्रिय मत्स्याहारी ठिकाणेः

  • मालवण – पांचपाखाडी, ठाण्यातील मालवणी खाद्यप्रेमींसाठी विश्वासार्ह ठिकाण.
  • फिशलॅंड – खोपट, ताज्या माशांपासून बनवलेले पदार्थ. प्रॉन्स आणि सुरमई खास.
  • कोंकण दरबार – के विला, घरगुती मालवणी थाळीसाठी ओळख.
  • दर्यासारंग – चेकनाका (LBS रोड), मोठ्या प्रमाणावर फिश आणि नॉनव्हेज थाळी उपलब्ध.
  • विजयदुर्ग – गोल्डन डाइज जंक्शन, पारंपरिक फिश करी रायस – प्रचंड लोकप्रिय.
  • निलम हॉटेल – घोडबंदर रोड, अतिशय चांगली नॉनव्हेज मेजवानी. मटण आणि चिकन प्रेमींसाठी आदर्श.

३. चिपळूणः कोकणातील अस्सल स्वादः
  • अभिषेक: हायवेला लागून प्रसिद्ध हॉटेल. मात्र हे हॉटेल हायवे टेस्ट प्रकारचे असल्यामुळे पारंपरिक रानचवीपेक्षा वेगळे.
  • दीपक: चिपळूण खरा कोकणी स्वाद घ्यायचा असेल तर दीपक येथे जा. तळलेले मासे, मच्छी करी, मटण फ्राय – एक नंबर. टोपीवाला मामा पुन्हा-पुन्हा वाढायला नेहमी तयार – कोकणी आदरातिथ्याचा खरी ओळख.

४. रत्नागिरीः सोलकढी आणि मच्छीप्रेमींसाठी स्वर्ग:
  • हॉटेल आमंत्रण:  माळनाका जवळ रत्नागिरीत येणाऱ्यांसाठी एक “लँडमार्क” खाद्यस्थळ.
  • प्रशांत लंच होम: बंदर रोड इथली सोलकढी म्हणजे अस्सल मालवणी सोलकढीची खरी परिभाषा. ताज्या माशांची चव अविस्मरणीय.
  • इतर प्रसिद्ध खानावळी:  मारुती मंदिर परिसरातील विहार हॉटेल, भिडे उपहार, आणि सतीशकाकाची घरगुती खाणावळ – स्थानिकांना अत्यंत प्रिय.


५. कोल्हापूर – तांबडा-पांढरा रस्सा आणि मोरी मटण:                                                                       1. वामन गेस्ट हाऊस: शाहूपुरी कोल्हापूरी स्टाईल मालवणी जेवण! येथील मोरी मटण (शार्कपासून       बनलेली  खास डिश) खाल्ली नाही तर तुम्ही  कोकणचा खरा स्वाद घेतलाच नाही.                                                     
  2. पेठांतील घरगुती खानावळी: कोल्हापुरच्या जुन्या पेठांत घरोघरी खानावळी – साधे पण अत्यंत          चविष्ट.
      
 3.  इतर प्रसिद्ध ठिकाणे: ओपेल, तंदूर, अयोध्या, राजधानी, सायबा, पद्मा गेस्ट हाऊस, पर्ल – सर्व            ठिकाणे  कोल्हापुरी झणझणीतपणासाठी प्रसिद्ध.

६. पुण्यातील मांसाहारी आणि फिश स्पेशालिटी हॉटेल्स:

  • सुगरण्स कोल्हापुरी:  सदाशिव पेठ,  तांबडा-पांढरा रस्सा, दहीकांदा, भाकरी – झकास कोल्हापुरी अनुभव.
  • आवारे लंच होम: 1901 पासून मटण/चिकन रस्सा, घरगुती मसाले, आणि इतिहास जपलेली खानावळ.
  • निसर्ग: नळस्टॉपमासेप्रेमींसाठी उत्कृष्ट पर्याय.
  • गोमंतक: डेक्कन, वरच्या मजल्यावर असलेले हे गोमंतक समुद्री पदार्थांसाठी प्रसिद्ध.
  • मालवण समुद्र: चिंचवड, मोरी मसाला आणि भरलेले पापलेट – खास.
  • हॉटेल आशिर्वाद: कुमठेकर रोड, मासे आणि कोळंबीसाठी उत्तम. गुरुवार बंद.
  • स्वराज्य: टिळक रोड, मालवणी जेवण आणि तांदळाची भाकरी – अप्रतिम.
  • दुर्गा बिर्याणी हाऊस: पुण्यातील प्रसिद्ध बिर्याणी – मंडई व टिळक रोड.
  • कलिंगा: नळस्टॉप, लाल करी + अप्पम = परफेक्ट जोडी.
  • हॉटेल सौंदर्य: डेक्कन, पुणेरी हिरवे (गावरान) मटण यासाठी प्रसिद्ध.
  • हॉटेल सर्जा: औंध, लता मंगेशकरांचे रेस्टॉरंट. चायनीज-इंडियन फ्यूजन नॉनव्हेजसाठी लोकप्रिय.
  • समुद्रा रेस्टॉरंट: कर्वेनगर, गोवन + मालवणी फ्लेवरची फिश करी.
  • कावेरी: वाघोली व इतर शाखा,  बोल्हाईचे मटण – खूपच प्रसिद्ध.
  • दोराबजी अण्ड सन्स:  कॅम्प, पारशी चिकन/मटण बिर्याणी, धनसाक, पात्रा फिश – जुना वारसा.
1) महाराष्ट्रात अस्सल मालवणी जेवण कुठे मिळते?
मुंबईतील दादर गोमांतक, गिरगाव समर्थ, वांद्रे कोकण्यांची खानावळ, पुण्यातील निसर्ग आणि चिंचवड मालवण समुद्र ही काही नामांकित ठिकाणे आहेत.

2) महाराष्ट्रातील सर्वोत्तम फिश थाळी कुठे खावी?
रत्नागिरी प्रशांत लंच होम, चिपळूण दीपक, ठाण्यातील विजयदुर्ग, पुण्यातील निसर्ग येथे उत्कृष्ट फिश थाळी मिळते.

3) कोल्हापुरी तांबडा-पांढरा रस्सा कोणत्या हॉटेलमध्ये प्रसिद्ध आहे?
सदाशिव पेठ सुगरण, कोल्हापुरातील वामन गेस्ट हाऊस आणि तंदूर हॉटेलमध्ये खरा कोल्हापुरी रस्सा मिळतो.

4) पुण्यात मांसाहारी जेवणासाठी सर्वोत्तम हॉटेल कोणती?
आवारे लंच होम, स्वराज्य, कलिंगा, सौंदर्य आणि निसर्ग ही ठिकाणे लोकप्रिय आहेत.

5) मुंबईत कोकणी-गोवन चवीचे हॉटेल कुठे मिळते?
हायवे गोमंतक (वांद्रे), गजाली (पार्ले), शिवाजी पार्क सिंधुदुर्ग, दादर गोमांतक या ठिकाणी अस्सल स्वाद मिळतो.

समारोप: डिजीयुगंधरा द्वारा प्रस्तुत, कोकण ते कोल्हापूर आणि मुंबई ते पुणे – महाराष्ट्रातील ही हॉटेल्स केवळ जेवण देत नाहीत, तर पारंपरिक चवीचा वारसा जपतात. मच्छीप्रेमी, मटणप्रेमी, किंवा मालवणी आणि कोकणी गावरान चवीवर प्रेम करणाऱ्यांनी ही यादी नक्की सेव्ह करुन ठेवा. प्रवासात उपयोगी पडेल. हि माहीती आपणास कशी वाटली ते Comment करून कळवा. धन्यवाद..!



टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

If you have any query, please let me know.

टिप्पणी पोस्ट करा (0)
https://www.effectivegatecpm.com/i753t25bv?key=4e88fd94f666800bc06717f96dec2dac